रावेर तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक बहूरंगी होण्याची शक्यता !

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज (शालीक महाजन) । तालुक्यात लवकरच निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. यात विकास कामे, जातीय समिकरण, आर्थीक, सक्षम असणाऱ्या उमेदवाराला पक्ष प्राधान्य देत असतो. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि प्रहार जनशक्ती अशी बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आपापला पक्ष जिल्हा परिषदेत प्रत्येक प्रक्ष आपला उमेदवार आण्यासाठी प्रयत्नांची परकाष्टा करणार आहे.

 

रावेर तालुक्यात सात गट आणि १४ गणासाठी निवडणूक होणार आहे. याची रचना अद्याप बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विकासा कामांसोबत जातीय समिकरणनुसार उमेदवारी देण्याची परंपर आहे. याबाबत रावेर तालुक्याचा विचार केला असता मराठा, लेवा पाटील, गुजर समाज अधिक आहे. त्या खालोखाल इतर अल्पसंख्यांक समाजाची मते आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा आताची होणारी निवडणूक ही भविष्याच्या राजकीय दृष्टीने महत्वाची असणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणाला फायदा तर कुणाचे नुकसान होणार आहे याकडे राजकीय समिकरणाची गणितावर अवलंबून आहे.

 

२०१७ मध्ये निवडणुकीत भाजपाचे ४, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी १ जागा

२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये रावेर तालुक्यात भाजपाने सहा जागांपैकी चार जागा मिळविल्या होत्या. उमेदवारांना एकूण ४९ हजार ८०६ मते मिळाले त्यानंतर शिवसेनाला एकही जागा टिकवता आली नाही. तरी भाजपानंतर २७ हजार १६३ मते मिळाली होती. त्यानंतर कॉग्रेसला पाच पैकी एका जागेवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला २४ हजार १९९ मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने तीन पैकी एक जागा जिंकली होती. त्यांना १९ हजार ४७३ मते मिळाली होती.

 

रावेर तालुका राजकीय दृष्ट्या महत्वाचा

रावेर तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. तर भाजपाचा गड अभेद्य ठेवण्याची जबाबदारी‍ जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, सुरेश धनके, प्रल्हाद पाटील यांच्यावर आहे. इकडे राष्ट्रवादीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार अरूण पाटील, निळकंठ चौधरी यांच्यावर जबाबदारी दिली. शिवसेना देखील चांगल्या तयारीला लागली असून बोदवडच्या निवडणूकीनंतर आमदार चंद्रकांत पाटील, प्रविण पंडीत  आणि रविंद पवार यांच्याकडे धुरा राहणार आहे आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या उमेदवारांची जबाबदारी ही अनिल चौधरी यांच्याकडे राहणार असल्याने रावेर तालुक्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक बहुरंगी असल्याची शक्यता आहे.

 

माजी आ. अरूण पाटील यांच्या भूमीकेकडे लक्ष

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विश्वासघाताचे शिकार झाले तेव्हापासून माजी आमदार अरूण पाटील चुप्पी साधून आहेत. त्याच्यावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव असल्याने आगामी निवडणुकीत माजी आ. पाटील हे आपली ताकद कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभी करतात याकडे देखील राजकरण करणाऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान निवडणूक तोंडावर आली असल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता देखील आहे.

 

 

मागील निवडणुकीत अशी होती स्थिती

पाल-केऱ्‍हाळा गटातुन नंदा पाटील (भाजप) २) खिरवळ-ऐनपुर गटात रंजना पाटील (भाजपा) ३)निंभोरा-तांदलवाडी गटात नंदकिशोर महाजन (भाजपा) ४) थोरगव्हान-मस्कावद गटात कैलास सरोदे (भाजपा) ५) थोड्याश्या मताने विवरा-वाघोदा गटात आत्माराम कोळी (राष्ट्रवादी) ६) खिरोदा-चिनावल गटात सुरेखा पाटील (कॉग्रेस) विजयी झाल्या होत्या.

Protected Content