खंडणी मागणार्‍यांना न्यायालयीन कोठडी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अल्पवयीन मुलीची बदनामी न करण्यासाठी खंडणी मागणार्‍या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या घटनेनंतर मुलीची बदनामी न करण्यासाठी तिच्या वडिलांकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणयावरून जयेश मोतीलाल सपकाळे, गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या तिघा आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीमुळे आरोपींंची जळगाव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: