जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुजरात राज्याची पावती जळगावात चालवुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा महिन्यानंतर वाळूची चोरणारे दोघेजण शहर पोलीस ठाण्यात शरण आले आहे. पोलीसांनी दोघांना अटक केली. जळगाव जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोढडी सुनावली आहे.
प्राप्त माहिती नुसार, २५ मार्च २०२३ रोजी, शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांच्या हद्दीत वाळूचा एक डंपर थांबवला. चालकाला पावती मागीतल्यावर त्याने मालकाला फोन लावला. मालकही तत्पर त्याने अवघ्या दहा मिनटात पावती घेवून धडकला. पावती बघीतल्यावर पावतीच्या वेळेत तफावत असल्याने पेालिस अधिकार्यांचा संशय बळावला. तत्काळ त्यांनी जळगाव तहसीलदारांनाच चौकशीसाठी पाचारण करुन वाहन, पावती त्यांच्या ताब्यात दिली. चौकशी अंती २७ मार्च रोजी रोजी तलाठी नितेष गोंविद ब्यावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात सचिन देवराम नन्नवरे (वय-३१, रा.बांभोरी), विकास गुलाब सोवणे (वय-३०) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा न्यायालयाने, उच्च न्यायालयाने अटकपुर्व फेटाळल्यानंतर नाईलाजास्तव संशयीतां शरणागती पत्करली. अटकेनंतर सहाय्यक निरीक्षक राजेंद्र बागुल यांनी संशयीताला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता ९ सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल गुन्हेशोध पथकासह तपास करत आहेत.