उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगरची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा असून १० सप्टेंबर रोजी जळगाव शहरात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना जळगाव महानगरची बैठक शिवसेना पक्ष कार्यालयात महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रविवारी १० सप्टेंबर रोजी जळगाव दौऱ्यावर येत असून पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण त्यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर शहरातीलमानराज पार्कच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. उध्दव ठाकरे यांचे जळगाव शहरात आगमन होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून त्यांची सभा यशस्वी होईलच असा आशावाद ही महानगर प्रमुख शरद तायडे यांनी व्यक्त केला.

 

या बैठकीला महानगर समन्वयक अंकुश कोळी संतोष पाटील, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, कोमेश सपकाळे, शाकीर खान, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, निता सांगोले, पिंटू सपकाळे, विभाग प्रमुख आणा भोईटे, निलेश ठाकरे, बबलू रंगरेज, शोएब खाटीक, निलेश तायडे, निलेश पाटील, दीपक जगताप, कार्यालय प्रमुख संजय सांगळे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content