ब्रेकींग : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने कामावर जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे.  जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे  मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय-२५, रा. अहिरवाडी ता. रावेर)  हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून, हातमजूरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास  तो दुचाकीने नेरुळ येथे कामावर जात असतांना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. 

अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. कुटुंबियांचा मनहेलावणारा आक्रोश मनोहरच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार असून त्याची पत्नी गरोदर असल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content