सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी लांबविली

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील बेस्ट बाजार परिसरातील पार्किंग झोनमधून सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धनराज वामन वानखेडे (वय-५८) हे आपल्या परिवारासह जामनेर शहरातील चांगदेव नगरात वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामाच्या निमित्ताने धनराज वानखेडे हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ११२१) ने जामनेर शहरातील बेस्ट बाजार परिसरात आले. येथील पार्कींग झोनमध्ये त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू दुचाकी मिळाली नाही. अखेर सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेर  पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल चाटे करीत आहे.

Protected Content