निष्काळजीपणा करणार्‍या ‘त्या’ ठेकेदाराला अटक करा : भील समाज विकास मंच

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आदिवासी भील समाजातील तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार व नगरपालिका अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी भील समाज विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

येथील जुना धरणगाव रस्ता येथील  विशाल रविंद्र गायकवाड या बालकाच्या, मृत्यूस कारणीभूत बेजबाबदार  प्रशासक ठेकेदार,न.पा अभियंता यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुण दोषींना त्वरीत अटक करण्याबाबत भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक सतीश गोराडे एरंडोल यांना निवेदन देण्यात आले.

या  निवेदनात नागरिकांनी वारंवार तक्रार करुण देखील प्रशासक व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले त्याच परिणाम म्हणुन आज एका अत्यंत गरीब कुटुंबातील बालकास आपला जीव गमवावा लागला, प्रशासक न.पा अभियंता  ठेकेदारस लवकर लवकर अटक करण्यात यावी अन्यथा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे तर्फे तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल व आंदोलनात काही बरे वाईट घडल्यास पुर्ण जबाबदारी ही शासन व प्रशासनाची राहील असा इशारा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटने कडुन, जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांनी दिला आहे.

दरम्यान, आज सदर  निवेदन देण्यासाठी दिपक अहिरे जिल्हाध्यक्ष, भैय्या मोरे एरंडोल तालुकाध्यक्ष,  सागर वाघ जि.प्रमुख सोशल मिडीया, निहाल सोनवणे, शिवा पहेलवान, देवराम वाघ, पंकज सोनवणे, मधुकर सोनवणे, खंडु बोरसे,सागर सोनवणे, दिपक मोरे,आनंद मालचे, आत्माराम वाघ,लश्मण जावळे विष्णू मालचे,धनराज पवार,दिपक सुर्यवंशी, आदी पदधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Protected Content