ट्रक-बसचा अपघात; प्रवाशी किरकोळ जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दुरदर्शन टॉवरजवळील राष्ट्रीय महामार्गावर बसला कट मारून पुढे जात अचानक ब्रेक मारल्याने बस ट्रकवर धडकली. या अपघातात प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव ते भुसावळ दरम्यान दुरदर्शन टॉवर समोरील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २० मिनीटांनी भुसावळकडे जाणाऱ्या बसला मागून येणाऱ्या ट्रक (एमएच ४० सीएम ७५४१) ने कट मारला आणि पुढे गेला. त्यानंतर चालकाने ट्रकचा ब्रेक लावल्याने ट्रक जागीच थांबला त्यामुळे मागून येणारी बस ट्रकच्या मागच्या बाजूल धडकली. यात बसचे मोठे नुकसान झाले तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान प्रवाशांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालक कमलेश संत बहादूर सिंग रा. मिर्झापूर उत्तरप्रदेश याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Protected Content