यावल प्रतिनिधी । आदीवासी विकास प्रकल्पांतर्गत येणोर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आदीवासी कर्मचारी एकता मंच आणि इतर आदिवासी संघटना लढा देणार असल्याची माहिती एम.बी.तडवी यांनी दिली. आज रविवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शहरातील पुर्णवाद नगरात आदीवासी कर्मचाऱ्यांचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, त्यावेळी तडवी बोलत होते.
याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील एकात्मिक आदीवासी विभागाअंतर्गत काम करणारे चतृर्थश्रेणीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आदीवासी विभागात सेवेत कार्यरत असणाऱ्या चतृर्थश्रेणी कर्मचारी बांधवांनी शासनाने दृर्लक्षीत असलेल्या विविध मागण्या व प्रलंबीत समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना आदीवासी विकास विभाग चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंचचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष एम.बी.तडवी यांनी उपस्थित कर्मचारी यांच्या मागील तिस वर्षापासुन शासनाच्या दृष्टीकोणातुन दुर्लक्षित असलेले चतृर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी, पेशन , अनुकंपा आधारावर कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी समावुन घेणे , त्याच बरोबर पगार मिळवण्यासाठी कार्यालयीन कारभारात होणारी आर्थिक लुट असे अनेक मुद्दे या विषयी त्यांनी उपस्थित कर्मचारी यांना संघटनाच्या माध्यमातुन एकजुटीने संर्घषातुन शासन दरबारी लढा दिलातर आणणास न्याय मिळेल असे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आश्वासीत केले. दरम्यान आज आदीवासी विकास विभाग चतृर्थश्रेणी कर्मचारी एकता मंचच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.
या कार्यकारणीत जिल्हाध्यक्षपदी दस्तगीर तडवी यांची तर उपाध्यक्षपदी विजयानंद सुरवाडे, जगदीश नाईक, महीला विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी एम.एन. खरात तर जिल्हा महीला उपाध्यक्षपदी पुष्पलता जाधव, सचिवपदी निलेश तडवी, सहसचिव प्रदीप बारेला, खजिनदारपदी न्याजोद्दीन तडवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणुन दिपक सोनवणे, नितिन चौधरी , सिद्धार्थ जाधव, हेमराज चौधरी, रोहीदास पाटील, भरत भेंडवाल, मनोज उजळेकर, संदीप पावरा, प्रशांत गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे .बैठकीत राज्य कार्यकारणीचे मनिष तडवी सर यांनी बैठकीस आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले .