फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे छात्र संसदेचे आयोजन

WhatsApp Image 2019 12 08 at 2.03.28 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय छात्र संसद फाउंडेशन एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अँड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसाच्या भारतीय छात्र संसदेचे २० ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती छात्र संसदचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अखिल भारतीय विध्यार्थी प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, एन.एस.यु.आय. चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे,  युवसेनाचे विद्यापीठ युवा अधिकारी अंकित कासार उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार संस्था, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद आयोजन करण्यात आले आहे. दहाव्या छात्र संसदेचे उद्घाटन गुरुवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होईल. तर समारोप रविवार २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्र सरकारचे युवक व कल्याण व क्रीडा राज्यमंत्री किरेन रीजाजू हे छात्र संसदेचे चीफ पॅट्रन आहेत. चार दिवस चालणाऱ्या छात्र संसदेत तेलगु अभिनेता, निर्माता, जनता सेना पार्टीचे पवन कल्याण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, थेरेपीचे मुख्य संपादक शेखर गुप्ता आदी उपस्थित राहणार आहेत. या छात्र संसदेमध्ये ८ सत्र घेण्यात येणार आहे. या छात्र संसदेत २९ राज्यातील ४५० विद्यापीठातील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आह. यावेळी भारतीय छात्र संसदेचे विद्यार्थी समन्वयक मनजित जांगीड, संदीप सूर्यवंशी, श्रेया मुथा, उमाकांत जाधव, पंकज सुराणा, मानसी भावसार, पियुष तिवारी, विनोद सोनी आदी उपस्थित होते.

Protected Content