दिल्ली अग्निकांड : मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख ; केजरीवाल सरकारची घोषणा

arvind kejriwal

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सेंट्रल दिल्लीच्या फिल्मिस्तान परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची दिल्ली सरकारने न्यायालयीन चौकशी करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली सरकारने नुकसान भरपाई म्हणून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 1-1 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाण्यची घोषणा केली आहे.

 

या आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या 30 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती आहे. या आगीत 56 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून गंभीररीत्या भाजलेल्या व्यक्तींना एलएनजेपी, लेडी हार्डिंग आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Protected Content