बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात जामनेरात निषेध आंदोलन !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत अपशब्द वापरले तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा आंधळे यांच्या बाबत अपशब्द केला आहे. या दोघा घटनेचा निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील नगरपालिका चौकात दोघेमंत्र्यांचा फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी नेते संजय गरुड, भास्कर पाटील, डी. के. पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना लेखी निवेदन देऊन दोघंमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार व मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागून राजीनामा दिला नाही तर महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा, लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी नेते संजय गरुड, भास्कर पाटील, डी. के. पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, अरविंद चितोडिया, राजेश नाईक, श्याम सावळे, प्रल्हाद बोरसे, संदीप हिवाळे, विनोद माळी, डॉ. बाजीराव पाटील, विनोद माळी, संतोष झाल्टे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content