विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्याला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात असलेल्या एका शाळेत दोन विद्यार्थींवर विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव कोळी याने अतिप्रसंग करत एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना १६ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. या संदर्भात मेहुणबारे पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पीडित विद्यार्थिनी, तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण आणि शाळेतील शिक्षक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यात सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने विशाल उर्फ दिगंबर अशोक जाधव याला दोषी ठरवत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Protected Content