काय सांगता ? : पोलिसदादाची इस्त्रीवाल्यांना पिस्तुलने उडवण्याची धमकी !

जळगाव प्रतिनिधी । इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे मागितल्याच्या रागातून पोलीस नाईकाने एक विवाहित महिलेसह तिचे पती व भाच्याला पिस्तुलने उडविण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

इस्त्री केलेल्या कपड्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहितेसह पती व भाचा अश्यांना पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ व मारहाण करून गोळीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की,  नटवर जाधव रा. सदगुरू नगर हा जिल्हा पोलीस मुख्यालयात असलेला पोलीस  नाईक म्हणून नेमणूकीला आहे. कौतीक नगरातील इस्तरी काम करणारे राधा विजय वाघ यांच्याकडे इस्तरी साठी कपडे टाकले होते. १६ मे रोजी रात्री घेण्यासाठी नटवर आला. राधा वाघा यांनी कपड्यांना प्रेस केले नाही. यापुर्वी केलेल्या प्रेसच्या कपड्यांचे पैसे द्या असे सांगितल्याचा राग पोलीस नाईक नटवर जाधव याला आल्याने राधा वाघ, तिचे पती विजय वाघ आणि भाचा विकी बेडीसकर यांना शिवीगाळ करून विकी बेडीसकर याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून बंदुकीच्या गोळीने मारण्याची धमकी दिली. राधा विजय वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस नाईक नटवर जाधव याच्यावर एमआयडीसी पोलीसात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

 

Protected Content