पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला घरातून काढले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेने माहेरहून १ लाख रूपये आणले नाही म्हणून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील माहेर असलेल्या सविता ज्ञानेश्वर ठाकरे (वय 30) यांचा विवाह बांबरुड ता. पाचोरा येथील ज्ञानेश्वर भिकन ठाकरे यांच्याशी रितीरिवाजानूसार २०११ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती ज्ञानेश्वर ठाकरे याने विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हालकीची असल्यामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग आल्याने पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांना घरातून हाकलून दिले. विवाहिता या चाळीसगाव येथे माहेरी निघून आल्या .याप्रकरणी बुधवारी २७ जुलै रोजी दुपारी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती ज्ञानेश्वर भिकन ठाकरे, सासु कौशल्याबाई भिकन ठाकरे, ननंद ललिता पंडित बागुल सर्व रा. बांबरुड ता.पाचोरा, दीर पंडित भिकन ठाकरे रा. नाशिक आणि नंदोई छोटू शिवराम काकडे रा. चाळीसगाव या पाच जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश पाटील करीत आहे.

Protected Content