रावेर शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

रावेर,  प्रतिनिधी । शहरात ब्रेक द चेन अंतर्गत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते, विना मास्क फिरणारे व दुकाने यांच्यावर दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

आंबेडकर चौक येथे दुपारी ११  नंतर विनाकारण फिरणारे यांच्या  २७०  टेस्ट करण्यात आल्या. यावेळी नगरपालिका व पोलीस कर्मचारी उपस्थित होते रावेर शहरासह तालुक्यात कडक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड, गांधी चौक,परिसरात सकाळपा शुकशुकाट होता. शहरात सकाळपासुन मुख्यधिकारी रविंद्र लांडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे रस्त्यावर फिरत होते. तसेच विना मास्क  फिरणारे,विनाकारण फिरणारे २७० जणांची अँटीजन स्टेट करण्यात आली. तसेच विना मास्क फिरणारे व अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्याने त्यांच्यावर  दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

 

Protected Content