अतिक्रमणच्या जागेवर वाईन शॉप !

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाला खोटे दस्तऐवज देऊन अतिक्रमणच्या बखळ जागेवर वाईन शॉप सुरू असल्याचे सांगत यासंदर्भात जळगाव येथे राज्य उत्पादन शुक्ल विभागास निवेदन देण्यात आले आहे.

बोदवड येथील मनोज वाईन शॉप व मलकापूर रस्त्यावरील देशी दारू दुकान अतिक्रमांच्या जागेत सुरू आहेत. शासनाला खोटे दस्तऐवज देऊन अतिक्रमणच्या बखळ जागेवर दारू दुकान सुरू असल्याची तक्रार नंदलाल पठे यांनी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्याकडे केली असून त्यांचे पोलीस नुकतेच या प्रकरणाविषयी चौकशीसाठी येऊन गेले असल्याचे वृत्त आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “बोदवड येथील मनोज वाईन शॉप व मलकापूर रस्त्यावरील देशी दारू दुकान या अतिक्रमणाच्या जागांमध्ये बांधलेल्या असून त्या जागेचे खोटे दस्तऐवज देऊन जागा दुसरी दाखवून या ठिकाणी सर्रासपणे दारूचे दुकान सुरू असल्याची तक्रार नंदलाल पठे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्याकडे केलेली आहे.

त्यांनी भुसावळ येथील दुय्यम निरीक्षक राजेश सोनार राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे प्रकरण पाठवून ‘खरं काय आहे ?’ त्या चौकशीसाठी पोलीस येऊन गेले आहेत. परंतु ते पोलीस देखील ज्या ठिकाणी लायसन्स दिलेले आहे त्याच ठिकाणी दुकान सुरू आहे. असा खोटा अहवाल वरिष्ठाकडे सादर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सीमा झावरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन ही जागा अतिक्रमण मध्ये आहे किंवा नाही याची चौकशी करावी. या संदर्भामध्ये १ ते ४१ पानांचे पुरावे नंदलाल पठे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे सादर केलेले आहेत. त्यामध्ये २०१७ मध्ये ही जागा रेगुलाईज करण्यात यावी. या संदर्भात हरीश खत्री यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रकरण सादर केल्याचे पुरावे देखील जोडलेले आहे.

यावरून ती जागा अतिक्रमणाची आहे हे सिद्ध होते. पण तरी देखील त्यांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी प्रयत्नशील दिसून येत आहे. वास्तविक ग्रामपंचायत असतांना वार्ड क्रमांक १ मध्ये ही अतिक्रमणची जागा येते. ग्रामपंचायतने या अतिक्रमांच्या जागा महसूल विभागात येत असल्यामुळे फक्त त्यांना बखळ जागा भाड्याने देण्याचा अधिकार आहे. तिथे कोणत्याही प्रकारे बांधकाम करण्याची परवानगी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कलेक्टर साहेबांच्या आदेशाशिवाय देऊ शकत नाही. (कारण ती जागा महसूल विभागाची आहे.) मनोज वाईन शॉप दुकान गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आहे आणि मलकापूर रस्त्यावरील देशी दारूचे दुकान ही 2016 / 2017 मध्ये बांधलेले आहे. त्यामुळे यांना कोणतेही बांधकामाची परवानगी नगरपंचायतीने दिलेली नाही. तरी देखील तिथे दुकान बांधून सर्रासपणे देशी दारू विकली जात आहे. जर ग्रामपंचायतीने तथा नगरपंचायतीने बखळ जागा दिलेली आहे. तर बखळ जागेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पंचनामा करून ही जागा हल्ली कोणाची आहे आणि केव्हा बांधकाम केले आहे. याचा स्थळ दर्शनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवावा. अशी मागणी थर्डआय फाउंडेशनकडून करण्यात आली असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नंदलाल पठ्ठे यांनी सांगितले.

Protected Content