Home क्राईम तोतया अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला लावला एक लाखाचा चुना

तोतया अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला लावला एक लाखाचा चुना

0
48

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गांजा अफू चेक करणारे अधिकारी असल्याची बतावणी करत दोन जणांनी शेतकऱ्याच्या कापडी पिशवीतील १ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याची घटना पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश पंडित पाटील (वय-५२) रा. कन्हेरे ता. पारोळा जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरेश पाटील हे पारोळा तालुक्यातील तांडा फाट्याजवळ गावाकडे पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीने आले. आम्ही गांजा अफू चेक करणारे अधिकारी आहोत असे सांगून सुरेश पाटील यांची हातात असलेल्या कापडी पिशवी चेक केली. त्यात एक लाख रुपये ठेवलेले होते. हे पैसे कशाचे आहेत असे विचारल्यावर मी बँकेतून काढले असल्याचे शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘आम्ही चेक करू’ असे बोलून त्यांनी १ लाख रुपये घेऊन दुचाकीवरून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound