भुसावळ येथे इनरव्हिल क्लबतर्फे वृक्षारोपण

0901b993 6ec7 4b1d a8b1 a771b5dce6fb

भुसावळ, प्रतिनिधी | येथील तापी नदीकाठील अन्नपुर्णा मंदिर परिसरात आज (दि.२७) इनरव्हिल क्लबतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी झाडांची संख्या वाढणे खुप गरजेचे आहे, त्यामुळे ‘झाडे लावू या पर्यावरण जपू या’ हा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी यासाठी ५२ झाडे उपलब्ध करुन दिली होती. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती देव, सचिव वंदिता पारे, नूतन फालक, कमल सचदेव, मनिषा तायडे, रजनी सावकारे, राजश्री कात्यायणी व रेशम लेखवाणी उपस्थित होत्या. केवळ झाडे लाऊन चालणार नाही तर त्यांची देखभाल व संगोपन करणेही गरजेचे असते. त्यामुळे ही जवाबदारी नुतन फालक यांनी स्वीकारली. कार्यक्रमासाठी गितेश देव, चेतन बोरनारे, अल्का भटकर यांचे सहकार्य लाभले.

Protected Content