गुजराथी वचनामृतचे मराठीत भाषांतर ; वडताल येथे ग्रंथाचे प्रकाशन

WhatsApp Image 2019 11 17 at 11.14.46 AM

फैजपूर, प्रतिनिधी | हरिभक्त यांना भक्ती, सुख,शांती व जिवन जगण्याचा मार्ग दाखविणारा भगवान श्री स्वामी नारायण यांनी लिहिलेला वचनामृत या गुजराथी भाषेतील ग्रंथ आता मराठी भाषेत उपलब्ध झाला आहे. श्री. स्वामी नारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष वेदांत व्यकरणाचार्य शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी या ग्रंथाचे मराठी भाषेत भाषांतर केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच वडताल (गुजरात) येथे पार पडले.

वडताल येथे श्री स्वामींनारायण मंदिर येथे भव्य दिव्य असा वचनामृत द्विशताब्दी महोत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज, नौतम स्वामी, स्वामी नारायण मंदिरचे कोठारी स्वामी घनश्याम प्रकाशदास यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावदा स्वामी नारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदासजी,उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास, भक्तिस्वरूपदास आदी.उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेता गोविंदा यांना शास्त्री भक्तिकिशोरदासजी यांनी वचनामृत ग्रंथ व ओडीवो पेन ड्राईव्ह भेट दिला. यावेळी अभिनेता गोविंदा मराठी भाषेत म्हणाले मला खूप मनस्वी आनंद झाला मी नशीबवान आहे की मला या मराठी ग्रंथाची आशीर्वादरुपी भेट मिळाली. मी अवश्य या ग्रंथाचे वाचन करेल असे सांगितले. आचार्य राकेश प्रसाद महाराज म्हणाले स्वामी नारायण भगवान यांनी मानवाच्या कल्याणासाठी लिहिलेल्या वचनामृत हा ग्रंथ संप्रदायातील प्रमुख ग्रंथ असून त्याचे गुजराथी भाषेचे मराठी भाषेत रूपांतरण करण्याचे कार्य शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी अनेक दिवस खूप मेहनत घेऊन लीलया पार पाडले. मराठी हरिभक्त यांना या ग्रथाचा खूप उपयोग होऊन समाजात सत्सागचा प्रसार होईल असे महाराज यांनी सांगितले. शास्त्री भक्तीकिशोरदास यांच्या या कार्याचे सर्वच संतांनी कौतुक केले. दरम्यान, शास्त्री भाक्तीकीशोरदास यांनी सांगितले की, भगवान श्री स्वामी नारायण यांनी स्वरचित केलेल्या वचनामृत या गुजराथी भाषेतील महान व पवित्र ग्रंथाचे मराठी भाषेत भाषांतर करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. महाराष्ट्र व विशेषत: खादेशातील मराठी हरिभक्त यांना स्वामी नारायण भगवान यांचे जीवन उपयोगी तत्वज्ञान आता आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्याचा मला अतिशय मनस्वी आनंद होत आहे.

Protected Content