संकेत मालपुरे यांचा मुंबई येथे सन्मान

WhatsApp Image 2019 11 17 at 5.57.07 PM

पारोळा, प्रतिनिधी | येथील दिलीप मुरलीधर मालपुरे यांचे पुतणे व अनिल मुरलीधर मालपुरे मुंबई यांचे चिरंजीव संकेत मालपुरे यांनी चार्टर्ड अकांऊटंटची पदवी घेतल्यानंतर त्यांना सीफए डिग्री मिळाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.

फाॅयन्शील क्षेत्रात देशात प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड फाॅयन्शील ॲनालिसीस सीफए इन्स्टिट्यूट युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्यावतीने अतिशय नामांकित समजल्या जाणाऱ्या सीफए डिग्री संकेत मालपुरे यांना मिळाल्याने त्यांचा बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स यांच्या वतीने माजी मंत्री जसवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल लाडशाखीय वाणी समाज अध्यक्ष किरण वाणी, स्वामी समर्थ हायस्कूलचे अध्यक्ष बापुराव नावरकर, हेमंकात मुसळे, दर्पण समुहाचे अध्यक्ष विजय नावरकर, आशा समुहाचे अध्यक्ष भुपेन्द्र मराठे, डॉ. रविद्र नावरकर नवयुक मंडळाचे सत्यजित शिरोळे, सचिन नावरकर, अरूण नारायण वाणी, आदिसह इतरांनी त्यांचे अंभिनंदन केले आहे.

Protected Content