Home Cities चोपडा चोपडा व फैजपूर डीवायएसपींची अदला-बदली !

चोपडा व फैजपूर डीवायएसपींची अदला-बदली !

0
61

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याच्या गृह खात्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यात फैजपूर आणि चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या परस्पर बदल्या करण्यात आल्या आहेत.

आज राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यात फैजपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांची चोपडा येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी चोपडा येथून डॉ. अन्नपूर्णा सिंग या येणार आहेत.

डॉ. अन्नपूर्णा सिंग या आयपीएस अधिकारी असून त्यांची अलीकडेच चोपडा येथे नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आता त्या फैजपूर येथे रूजू होणार आहेत. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने या बदलींचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound