ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये रंगल्या क्रीडा स्पर्धा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये वार्षीक क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.

ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे दोन दिवशीय वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२३/२४ तसेच नाताळ निमित्त कार्यक्रम पार पडला. दि २० रोजी कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.यावेळी नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळविले, यानंतर विद्यार्थ्यांनी नाताळ गीत गायले.

तर दि.२१ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे,सेक्रेड हार्ट चर्च चे फादर बर्नाडीट डिसूजा, ऍडव्होकेट आय आय खान (सेवानिवृत्त प्रिन्सिपल रेल्वे स्कुल भुसावळ), अशोक सपकाळे (रेल्वे सेवानिवृत्त एथेलेटिक कोच) हे उपस्थित होते. यात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोहण,मशाल प्रज्वलाने झाले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी हाऊस वाईस परेड सादर केली.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल त्यात योगा,पॉम पॉम,सेल्फ डिफेन्स,हॅन्की ड्रील,लेझीम, बटरफ्लाय ड्रील,ऐरोबिक्स, कॅरल सॉंग,क्रिब डेकोरेशन, १०० मीटर रेस,४०० मीटर रेस तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम स्थानी भूमी (ग्रीन) हाऊस, द्वितीय स्थानी अग्नी (रेड) हाऊस, तर तृतीय स्थानी वायू (यलो) हाऊस विजयी झाले.

प्रिंसीपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा तसेच खेळाचे महत्त्व समजावून सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सोफिया पिबोडी, कय्युम शेख यांनी केले.सर्व क्रीडा शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
प्रिंसीपल नीना कटलर यांनी आभारप्रदर्शन केले.

Protected Content