महायुतीतर्फे व्यापारी मेळाव्यांचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर चाळीसगाव, पाचोरा व भडगाव येथे महायुतीतर्फे व्यापारी बांधवांसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव, भडगाव आणि पाचोर्‍यात व्यापारी मेळावे आयोजित करण्यात आले. चाळीसगावात वाणी समाज मंगल कार्यालयात तालुक्यातील व शहरातील व्यापारी व्यावसायिक बांधवांच्या व संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी मेळाव्या चे आयोजन करण्यात आले यावेळी माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशाचा आर्थीक विकासदर गेल्यापाच वर्षात वाढला असुन येणार्या काळात यामध्ये आणखी सुधारणा होऊन व्यापार वाढीस मोठ्याप्रमाणात मदत होणार आहे. याचा फायदा निश्‍चितच समाजाच्या सर्व स्तरातील नागरीकांना होणार असल्याने प्रगती करणार्या सरकारच्या पाठीशी उभे राहण्यासाठी देशाचे कणखर नेतृत्वालाच मतदान करणे गरजेचे आहे . याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे उपनेते सुरेशदादा जैन यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील, जळगाव चे माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे ,व्यापारी आघदीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,, तालुकाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष अमित सुराणा, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष जितेंद्र देशमुख,,योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, भाजप तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, संजय पवार, प्रितमदास रावलानी, लालचंद बजाज ,व्यापारी पदाधिकारी अमित सुराणा, संजय पवार, प्रितमदास रावलानी आदि उपस्थित होते.

याचप्रमाणे पाचोरा आणि भडगावातही मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. यात सुरेशदादा जैन म्हणाले की, व्यापारी दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येतो. त्याने दिलेल्या सेवेमुळे जनसामान्यांचा त्यांच्यावर विश्‍वास असतो. येणारी निवडणूक ही राष्ट्रासाठी महत्वाची असुन आपण सर्वांनी ग्राहकांपर्यंत मोदी साहेबांंनी केलेल्या सर्वांगिण विकासाबाबत माहिती देवून त्यांना देशहितासाठी महायुतीच्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन करावे असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात आर्थीक विकासाचा दर ७.१ पर्यंत वाढला आहे. येत्याकाळात सरकारतर्फे आखण्यात आलेल्या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर हा जीडीपी अजुन वाढेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आमदार उन्मेष पाटील म्हणाले की, देशाच्या भल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं चे हाथ बळकट करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत. मी आपणास विश्‍वास देतो. राज्यातला आदर्श खासदार होण्यासाठी मी समाजातील सर्व घटकांसाठी मी मेहनत घेईन. आपणच नरेंद्र मोदीं आहेत असे समजून समाजाच्या विकासासाठी सर्व सज्जन शक्तींनी पुढचे पाच दिवस देशाच्या पवित्र कामासाठी द्यावेत. कमळाला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Add Comment

Protected Content