जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्रीधर नगरात राजू कडू बहारे हे तलाठी वास्तव्यास असून सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रामानंद नगरातून मेहरुण येथे ड्युटीवर जात होते. गिरणा टाकी परिसरात (एमएच १८ झेड ७९३२) क्रमांकाचे ट्रॅक्टर व (एमएच १९ एएन ८६५१) क्रमांकाची ट्रॉलीतून वाळू खाली करतांना दिसले. दरम्यान, तलाठी यांनी ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर खाली न करण्यास सांगत त्याची विचारपूस केली. यावेळी चालकाने त्याचे नाव गणेश अशोक कुंभार रा. पाळधी तर ट्रॅक्टर मालक प्रवीण हिरामण बाविस्कर रा. निमखेडी असे सांगत त्यांच्या सांगण्यावरुन ट्रॅक्टर चालवित असल्याचे सांगितले. तसेच वाळू कोठून आणली त्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. चालकाची विचारपुस करीत असतांना चालकाने ट्रॅक्टर सोडून तेथून पळ काढला. तलाठी यांनी ट्रॅक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.