प्रेम संबांधातून खून ; २४ तासात आरोपींना अटक

 

भुसावळ, प्रतिनिधी । नशिराबाद पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळावर तरुण मयत अवस्थेत आढळून आला होता. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी २४ तासात ४ आरोपींना अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील सुनोदा गावातील रहिवाशी दिपक रघुनाथ सपकाळे याचे त्याच्या घरासमोरील महिले सोबत प्रेम सबंध होते. याबाबतची माहिती महिलाचा पती व भाऊ होती. यावल तालुक्यातील पाडळसा गावामध्ये दोन दिवसांपूर्वी हळदीच्या कार्यक्रमासाठी महिला आपल्या माहेरी आली होती. महिला पाडळसा येथे गेली असल्याची माहिती दिपकला मिळाल्याने त्याने आपल्या मित्रांसोबत पाडळसा गाव गाठले. मित्रांना पाडळसा गावाजवळील पाटाच्या चारीजवळ नेऊन थांबवले. मित्रांना अर्ध्या तासात परत येतो असे सांगून निघून गेला. परत न आल्याने मित्रांनी फोन केले असता दिपकच्या फोन बंद येत होता. उशीर झाल्याने मित्रांनी शोघ घेण्यास सुरुवात केली असता दिपकचा कोठेही ठाव ठिकाण लागत नसल्याने मित्रांचा संशय पक्का झाला. दिपक सोबत काही तरी दुर्दवी घटना घडली असावी? दिनांक २७/१२/२०२० रोजी सकाळी ५.०० वाजेला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना नशिराबाद वरून फोन आल्याने नशिराबाद हद्दीत रेल्वे रुळावर एका तरुणांचा मृतदेह पडलेला आहे. वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन शहानिशा केली असता रेल्वे अपघात आहे की, घातपात आहे ने सांगणे कठीण होते. मयतांचे नाव व गावाची माहिती मिळविण्यास पोलिसांसमोर एक आव्हान होते.

पोलिसांचे तपासचक्र चालू असल्याने काही वेळेतच मयतांचे नाव व गावाची माहिती मिळविण्यास पोलिसांना यश आले. मयतांचे नाव दिपक रघुनाथ सपकाळे राहणार रावेर तालुका सुनोदा गावा असल्याचे निष्पन्न झाले. नेमकी घटना काय घडली याचा तपास करण्यासाठी निंभोरा पोलिस स्टेशन व सावदा पोलिस स्टेशनची मदत घेतली. खरी कामगिरी फौजपुर पोलीस स्टेशनची असल्याने दिपक सपकाळे यांचा अपघात नसून घातपात झाल्याचे निष्पन्न झाले व दिपकचे मर्डर करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या स्वाधीन केले. त्या आरोपीच्या माध्यमातून ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

रावेर तालुक्यातील सुनोदा गावातील रहिवाशी दिपक रघुनाथ सपकाळे हा केळी भरण्याच्या गाड्यावर काम करीत असे. सुनोदा गावातील दिपकच्या राहत्या घरासमोरील महिले सोबत दिपकचे प्रेमसबंध (अनैतिक संबंध) होते. यावल तालुक्यातील पाडळसा गावामध्ये दोन दिवसांपूर्वी हळदीचा कोळी समाजामध्ये कार्यक्रम होता. यासाठी दिपकची प्रेयसी आपल्या माहेरी त्या ठिकाणी आली होती. दिपकला भेटण्याची इच्छुा निर्माण झाल्याने मित्रांसोबत पाडळसा येते बामणोद रस्त्यावरील पट्याच्या चारी जवळ मित्रांसोबत थांबला. अर्ध्या तासात येतो असे सांगून निघून गेला व काही वेळेनंतर परतला. पुन्हा थोडे वेळेनंतर मित्रांना येतो असे सांगून  निघून गेला तर परतला नसल्याने मित्रांना चिंता वाटू लागली. एवढा वेळ झाला नेमका दिपक कोठे गेला असावा? मित्रांनी शोधा- शोध केली दिपक न मिळाल्याने त्यांना खात्री झाली की दिपक सोबत काही तरी घटना घडली असावी? दिपक हा त्यांच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला आहे याबाबत त्यांच्या मित्रांना माहिती होती. महिलेच्या भावाला माहिती होते की दिपकचे त्यांच्या बहिणी सोबत प्रेमसबंध सुरू आहे व भेटण्यासाठी दिपक पाडळसा गावात आला असल्याचीकुणकुण महिलेच्या भावाला व पाहुण्याला लागली होती. यांनी पूर्व नियोजन करून राहत्या घरी रात्रीच्या वेळेस हळदीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याची संधी साधून आरोपींनी दिपकचा गेम केला. दिपकचा अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेह नशिराबाद हद्दीत रेल्वे रुळावर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीनी करण्याच्या हेतूने फेकला होता.

सकाळी उठून सर्व जण लग्नासाठी यावल तालुक्यातील रायपूर गावाला गेले. जणू काही घटना घडलेच नाही असे भासवून हळदीच्या कार्यक्रमात दिपकच्या शरीराचे तुकडे करून गुप्तांग कापून ह्रदयथरारक करणारी घटना करून मृतदेहाला ठिकाणावर लावून बिनधास्त पणे फिरत होते. या दरम्यान दिपक घरी न आल्याने त्यांचे वडील व नातेवाईक पाडळसा गावात हेमंत बाळू कोळी यांच्या घरी दिपकचा शोध घेण्यासाठी आले होते. दोन दिवस घटनेला झाल्याने आरोपी बिनधास्त होते.

पण सकाळी ५.०० वाजेला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे भुसावळ भाग भुसावळ यांना नशिराबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश चव्हाण यांचा फोन आला. रेल्वे रुळाजवल एक मृतदेह पडलेला आहे. वेळेचा बिलंब न करता वाघचौरे यांनी घटनास्थळ गाठले व घटनेची शहानिशा करून त्या दिशेने तपास सुरू केला. कदाचित रेल्वे अपघात झाला असावा यासाठी श्री. वाघचौरे यांनी रेल्वे अपघात कुठल्या गोष्टी मुळे होऊ शकतो याची तपासणी केली. मयताच्या शरीराचे तुकडे करून चेहऱ्यावर मारण्याचे निशाण घटनेला वेगळे वळण देत होते. हा रेल्वे अपघात नसून हा घातपात असावा याची खात्री श्री. वाघचौरे यांना झाली होती. घटनास्थळी एम.पी.०९ वाय.जी ४२६९ ही मोटरसायकल नशिराबाद पोलिसांना हस्तगत झाली होती. घटना घडल्यामागिल कारण हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांचे तपासचक्र सुरू होते.यासाठी निंभोर पोलीस स्टेशन व सावदा पोलीस स्टेशन यांची मदत घेण्यात आली होती. काही वेळेनंतर मृतदेहाचे नाव दिपक भगवान सपकाळे असल्याचे उघड झाले. राहणार रावेर तालुक्यातील सोनदा गावातील आहे. निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुनोदा गावातील दिपक रघुनाथ सपकाळे यांचा फोटो ओळखसाठी पाठविला असता फोटोतील मृतदेह दिपकचा असल्याचे निष्पन्न झाले.

आता पोलिसांसमोर प्रश्न उभा होता हा मृतदेह नशिराबादमध्ये गेला कसा ? दिपक रघुनाथ सपकाळे याचे त्यांच्या घरासमोरील विवाहित महिले सोबत प्रेमसंबंध सुरू होते. याबाबत महिलेचे पती व भाऊ यास सर्व माहिती होती. महिलेच्या भावाने व पतीने प्लॅनिंग करून दिपकला हळदी ठिकाणी बोलावून घेऊन धारदार शस्त्राने वार करून दिपकचा काटा काढून त्यांचा मृतदेह ओम्नी चारचाकी वाहनाने नेवुन नशिराबाद हद्दीतील रेल्वे रुळावर नेऊन टाकला असावा? याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला ३८/२०२० सी.आर.पी.सी.कलम १७४ प्रमाणे अपघात मृत्यू नोंद करण्यात आली होती. हा अपघात नसून घातपात असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत होती. दिनांक २७ डिसेंबर रोजी यावल तालुक्यातील कासवा गावामध्ये यात्रा होती. ती यात्रा न भरण्यासाठी फैजपूर पोलिस स्टेशनचे पोना किरण चाटे बंदोबस्तासाठी गेले असतांना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भेटले व घातपात झाल्यासंबंधी तपासकामी आल्याचे सांगितले. एक दिवसांपूर्वी किरण चाटे यांनी हेमंत कोळी यास तंबी दिली होती रिकामे कामे करायचे नाही व दुसऱ्या दिवशी हेमंत बाळू कोळी यांच्या शोधत पथक आले असता आरोपीस फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना किरण चाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात दिले. आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असता सर्व चित्र काही क्षणातच स्पष्ट झाले. दिपक सपकाळे यांचा अपघात नसून घातपात करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले.

फिर्यादी भगवान रघुनाथ सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस स्टेशनला नितीन राजू धाडे (वय २४ रा. सुनोदा), हेमंत बाळू कोळी उर्फे तायडे (वय २१ रा. पाडळसा) तसेच महिला व अल्पवयीन आरोपी असे चार जणांविरुद्ध जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस स्टेशनला भाग -५ गुरुन २१५/२०२० भा.द. वि.कलम ३०२,२०१,१२०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.

Protected Content