रेल्वेस्थानकाजवळ अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रेल्वेस्टेशनच्या लागून आलेल्या संरक्षण भिंतीजवळ अनोखळी ६० वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री समोर आली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्टेशनच्या संरक्षणभिंतीजवळ रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, ओळख पटविण्यासंदर्भात कोणतीही माहिती मयताजवळ मिळून आली नाही. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचा शरीरबांधा सडपातळ, अंगात फुल बाहीचे निळ्या रंगाचे शर्ट, काळपट रंगाची फुल पॅन्ट असे वर्णन असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलीसांनी केले आहे.

 

Protected Content