Home क्राईम आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली ; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली ; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
120

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी खुर्द येथे सोशल मीडियावर एका समाजाची भावना दुखावणारी क्लिप वायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द या गावात संशयीत आरोपी गौरव बळीराम लोहार (वय-१९) या तरुणाने एका विशिष्ट समाजाची भावना दुखावणारी क्लिप टाकून सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ही क्लिप व्हारयरल झाल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. या अनुषंगाने एका ६५ वर्षीय व्यक्तीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गौरव बळीराम लोहार यांच्या विरोधात रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.


Protected Content

Play sound