अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पळासदळे यांच्या शिवारातील शेतातून एका शेतकऱ्याच्या मालकीचे टॅक्टरची चोरी केल्याची घटना १३ जून रोजी सकाळी साडेसात वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ जून रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पळासदळे शिवारातील शेत गट नंबर १२ मध्ये गुलाबराव अभिमन पाटीलवय ६० यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ इए ७५९२) हे पार्कींगला लावलेले होते. १२ ते १३ जून च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चोरून नेले, हा प्रकार १३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता समोर आला. त्यानंतर त्यांनी सर्वत्र ट्रॅक्टरचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी १९ जून रोजी दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनिरीक्षक रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.