बुलडाणा प्रतिनिधी । चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पुर आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेत पेनटाकळी प्रकल्पाच्या नदीपात्रातून 6742 क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती लक्षात घेता. आज दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री 12:05 वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बुलडाणा कन्ना, उ.वि.अ.पाटबंधारे विभाग रोकडे, शाखा अभियंता चिखली राजपूत यांनी पेनटाकळी प्रकल्पस्थळी भेट दिली. याप्रसंगी, चौगुले उ.वि.अ. पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर, वचकल कनिष्ठ अभियंता, पिठे कनिष्ठ अभियंता, व पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.