
जळगावी (प्रतिनिधी ) महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी महापालिका मालकीच्या गोलाणी मार्केटचा तत्कालीन नगर पालिकेने ५० मुदतीचा भाडे करारनामाचा ठराव बेकायदेशीर असल्याचे ठरवून तो ठराव शासनाकडे विखंडनाला पाठवला होता यावर मार्केट व्यापारी असोशिएनने हरकत घेतली असून राज्यशासनाकडे उपाध्यक्ष नागराज जनार्दन पाटील यांनी याचिका दाखल केली आहे अशी माहिती असोसिएशनचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी दिली.
गोलाणी मार्केटचा गाळे करार ठराव विखंडणावर दाखल केलेल्या याचीकेची माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रंसंगी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कासट, सचिव रामजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष नागराज पाटील उपस्थित होते. यावेळी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले की, तत्कालिन जिल्हाधिकारी श्री निंबाळकर यांच्याकडे जळगाव मनपा प्रभारी आयुक्तपदाचा पदभार होता. तेव्हा गोलाणीत अस्वच्छता असल्यावरून कलम 133 अन्वये मार्केट बंदची नोटीस दिली होती. चर्चेतून 3 महीन्यांसाठी प्रायोगित तत्वावर स्वच्छतेसाठी प्रति व्यापारी अकराशे रुपये देण्याचे ठरले. मात्र, मार्केटमध्ये स्वच्छतेचे काम केवळ २ महीने झाले. बाकी पैशाचा हिशोब देखील दिला नाही. तसेच तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी निंबाळकरांनी गोलाणी मार्केटमधील गाळे कायद्यानुसार तीन वर्षापेक्षा जास्त काळ भाड्याने देणे बेकायदेशीर असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना ५०चा गाळे कराराचा ठराव विखंडनासाठी त्यांनी शासनाकडे पाठवीला होता. शासनाकडून मनपा प्रशासनाला अधिकची माहीती मागितल्यावर त्यांनी मार्केटची स्वच्छता होत नसल्याचे सांगीतले होते. या विखंडनाच्या प्रस्तावावर असोसिएशनर्फे नगरविकास मंत्रालयात हरकत घेणारी याचिका दाखल केली आहे. हे मार्केट पालिकेने बिओटी तत्वावर बांधले असल्याने त्यास तीन वर्षाचे भाड्याने देण्याचा नियम लागू होत नसल्याचा दावा याचिकेत त्यांनी केला आहे.