भुसावळात आरपीएफ अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारा अटकेत

bhusawal news 4

भुसावळ प्रतिनिधी । आरपीएफच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की व शिविगाळ केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात दाखल गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, 23 सप्टेंबर 2019 रोजी आरपीएफचे अधिकारी समाधान भिकाजी वाहुळकर रा.भुसावळ हे व त्याचे सहकारी कर्मचारी हे त्याच्याकडील गुन्ह्याच्या तपास कामी भुसावळ शहरात कन्हैया कुंज जवळ आले. याच रेल्वे पोलीसाने पुर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात ठेवून संशयित आरोपी नरेश बाबुराव गुडवे रा. पंधरा बंगला भुसावळ याने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अनिल अडकमोल, पोना रमण सुरळकर, पोकॉ विकास सातदिवे, ईश्वर भालेराव व चालक पोहेकॉ अयाज सय्यद यांनी कारवाई करत आरोपी नरेश गुडवे यांला पंधरा बंगला येथून अटक केली. पुढील सपोनि कार्तीकर करीत आहे.

Protected Content