राज्यातील सरकार फेकू सरकार आहे ; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

अहमदनगर (वृत्तसंस्था)आपल्या दुधसंघातून मलिदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत. तसेच राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे. हे फेकू सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

 

विखे पाटलांनी आज इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती केली. विखे पाटील पुढे म्हणाले की, कोव्हिडच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र एक नंबरला आहे ही दुर्दैवी बाब आहे. कोव्हिड संदर्भात परिस्थिती हाताळण्यात सरकारला आलेल हे अपयशच आहे. अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन उठवण्याचे भाष्य करत आहे. त्याचे परिणाम जनता भोगत आहे. दूधाचे दर वाढू नये ही मंत्र्यांचीच भूमिका असून दूध संघातून मिळणारा मलिदा खाणारे मंत्री आहेत, असा घणाघाती आरोप देखील विखे पाटील यांनी केला आहे. राज्यातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून, आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत असल्याचे देखील विखे पाटील म्हणाले.

Protected Content