Home राजकीय अनेकजण दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही

अनेकजण दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही

0
103


नवी दिल्ली: वृत्तसंस्था । हाथरस घटनेवरून या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की अनेक भारतीय देशातील दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हाथरसच्या पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असे मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस सांगतात, कारण त्यांच्यासाठी तसेच इतर अनेक भारतीयांसाठी पीडिता ही कोणीच नव्हती, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

बीबीसीच्या एका बातमीत. पोलिस आणि राज्य सरकारचे अधिकारी पुन्हा-पुन्हा सामूहिक बलात्कार झालाच नसल्याचे सांगत असल्याचे म्हटले आहे.

यावर टिप्पणी करताना राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारची खिल्ली उडवली आहे. ‘लज्जास्पद गोष्ट ही आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस म्हणतात की, कोणीही बलात्कार केलेला नाही. कारण त्यांच्यासाठी, तसेच इतर अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती.’ राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या पूर्वी राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर विशेष विमान खरेदी करण्यावरून टीकास्त्र सोडले होते.


Protected Content

Play sound