‘त्या’ कैद्यांकडे पिस्तूल आले कसे ?; कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहातून फरार झालेल्या तिघा कैद्यांजवळ पिस्तूल आले कसे? व कारागृह मुख्यप्रवेशद्वाराच्या तुरूंगरक्षकाच्या कार्यालयात कैदी पोहचले कसे ? याप्रश्नांमुळे जिल्हा कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जळगाव जिल्हा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले कैदी आरोपी सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.शिरूड नाका, तांबापूरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) यांनी सुरक्षारक्षक ऑनड्यूटी असतांना तिघांनी मारहाण केली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत मुख्यप्रवेशद्वारातून पळ काढला. दरम्यान, तिन्ही आरोपींकडे पिस्तूल कसे आले. यात गुन्ह्यात तुरूंगरक्षकासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरी बाजू अशी की, ज्या पद्धतीने कैद्यांकडे पिस्तूल पोहचते तर साहजिक मोबाईलही पोहचू शकतो. ज्या पध्दतीन धाक दाखवून तिन्ही आरोपी कारागृहाच्या बाहेर पडताच धान्य गोदाम जवळ जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता.पारोळा हा दुचाकी सुरू करून पळून जाण्याच्या तयारीतच होता. त्यावरून फरार होण्याची तयारी असल्याची शंका व्यक्त होत असून याची कसून चौकशी सुरू आहे.

जिल्हा करागृहाचा कारभार नेहमीच वादात !
जळगाव येथील जिल्हा करागृहाचा कारभार नेहमीच वादात अडकला आहे. यापुर्वीही कारागृहात अनेक खळबळजनक घटना घडल्या आहेत. त्यातच आज पुन्हा तीन कैदी पिस्तूलाचा धाक दाखवून फरार झालेत. यापुर्वी न्यायालयीन कोठडीत चार कैद्यांनी अमळनेरचा दाऊद म्हणून ओळख असलेला शुभम मनोज देशमुख उर्फ शिवम यांच्यावर पत्र्याचा चाकू बनवून प्राणघातक हल्ला केल्या घटना १५ डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. जामनेर तालुक्यातील बिलवडी येथील आरोपी शेषराव सुभाष सोनवणे आणि बोदवड येथील रविंद्र भिमा मोरे हे चोरीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात कच्चे कैदी होते. दोघांवर स्वयंपाकाची जबाबदारी देण्यात आली होती. ५ डिसेंबर २०१८ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास दोघांना बाहेर काढण्यात आले. थोडावेळ काम केल्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरून उडी मारून दोन्ही कैद्यांनी संधी साधून पळ काढला.

Protected Content