आजाराला कंटाळून प्रौढ व्यक्तीने तापीपात्रात घेतली उडी !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून भुसावळ शहराजवळील तापी नदी पात्रात उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवार १० जून रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश जगदीश सपकाळे (वय ४२, जुना सातारा, कोळीवाडा, भुसावळ) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, योगेश सपकाळे हा आपल्या परिवारासह भुसावळ शहरातील कोळीवाडा परिसरात वास्तव्याला होता. गेल्या अेनक वर्षांपासून त्याला दुर्धर आजार होता. या आजाराला कंटाळून योगेश याने भुसावळ शहरातील तापी नदी पात्रात उडी घेतली. खाली तो खडकावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी १० जून रोजी दुपारी १२ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय कंखरे करीत आहेत.

Protected Content