किरकोळ कारणावरून तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी येथे गाडी लावण्याच्या कारणावरून पंक्चर काढणाऱ्या तरुणाला दोन जणांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना ३० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी गावाजवळ मोहम्मद नूर आलम (वय-३०) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पंचर दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गावातील बसस्थानक नजीक त्याचे बिहार लकी टायर नावाचे त्याचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. ३० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जालिंदर लक्ष्मण गायकवाड आणि प्रशांत जालिंदर गायकवाड (दोन्ही रा. संभाजीनगर) हे दोघं गाडीने आले. व मोहम्मद नूर यांच्या दुकानासमोर लावली. गाडी पुढे घ्या याचा राग आल्याने मोहम्मद नूर याला दोघांनी गाडीतील लोखंडी रॉडने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी ३१ मे रोजी रात्री ८ वाजता याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जलींदर लक्ष्मण गायकवाड आणि प्रशांत जालिंदर गायकवाड या दोघांवर पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Protected Content