तोंडापूर शिवारातील शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी

पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोंडापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातून प्लास्टिक ठिबक नळ्या चोरून येण्याची घटना समोर आली आहे. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात बुधवारी ३१ मे रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर एकनाथ साबळे (वय-३०, रा. तोंडापूर ता.जामनेर) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांचे जामनेर तालुक्यातील तोंडापूर शिवारात शेत गट क्रमांक 208 मध्ये शेत आहे. या शेतात त्यांच्या मालकीच्या ठिबक निळ्या ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान अज्ञान चोरट्यांनी ३० मे ते ३१ मे च्या दरम्यान मध्यरात्री शेतातून ठिबक नद्यांचे बंडल चोरून नेले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकरी ज्ञानेश्वर साबळे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार पहुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हंसराज वाघ करीत आहे.

Protected Content