तिघांवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

crime newss

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भवानी पेठेत फेब्रुवारी महिन्यात तिघांवर तरूणांवर तलवार आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केला होता. जखमी तरूणाच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातपैकी उर्वरित दोघांना आज अटक करण्यात शनीपेठ पोलीसांना यश आले आहे. आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अनस सलीम, इरफानशा युसुफशा आणि अतीकखान हमीदखान तिघे रा. जोशी पेठ पाळधी येथे एका कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी परतत असतांना शहरातील भवानीपेठ भागात झाशी राणी पुतळ्यासमोर 18 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे (वय-19), गणेश रविंद्र सोनवणे (वय-19), दिपक सुकलाल सोनवणे (वय-19), अक्षय संजय सपकाळे (वय-19), विक्की अरूण चौधरी (वय-23), शुभम उर्फ भैय्या गोविंद सोनवणे (वय-22) सर्व रा. कांचन नगर आणि अनिल रसाल राठोड (वय-20) रा. कासमवाडी, जुना मेहरूण रोड यांनी मारहाण करत तलवार आणि चॉपरने वार केले होते. यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

मोहम्मद अनस सलीम बागवान यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच जणांना यापुर्वी या प्रकरणात अटक करण्यात आले होते. उर्वरित विक्की अरूण चौधरी, अनिल रसाल राठोड या दोघा संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी आज पहाटे 5 वाजता अटक करण्यात आली. आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या कामी स.फौ. दिनेशसिंग पाटील, सलिम पिंजारी, प्रशांत पाटील, किरण बनसोडे, हकीम शेख, संजय शेलार, योगेश बोरसे, नितीन बाविस्कर, गिरीश पाटील यांनी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content