खड्डयांविरोधात युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनतर्फे ‘साखळी उपोषण’ (व्हिडीओ)

sakhali uposhan jal

जळगाव प्रतिनिधी । शहरातील संपुर्ण खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे यासाठी युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनतर्फे आज महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, साखळी उपोषण करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील चित्रा चौक येथे 13 जुलै रोजी अनिल बोरोले तर 14 जुलै रोजी उज्‍ज्वल सोनवणे यांच्या खड्डे आणि खराब साईडपट्टी असलेल्या कारणामुळे मृत्यू झाला. अशा अनेक घटना शहरात घडत असतात. अशा काही घटना यानंतर घडू नये म्हणून जळगाव शहरातील खड्ड्याचे केव्हा डांबरीकरण करुन ते बुजवले जावे यासाठी युवा फाउंडेशनतर्फे साखळी उपोषण करण्यात येत असून, प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही, तोपर्यंत ही साखळी उपोषण असेच चालू राहील, असे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी सागर बोरोले, चेतन पाटील, चैतन कोल्हे, स्वप्निल कोल्हे, विपुल मोरे, प्रितेश मोरे, उत्कर्ष कोल्हे, सुयोग वायकुळे, हिमांशू सोनार, निखिल पाटील, जय सोनार, दीपक काळे, गौरव सपकाळे, अभय महाजन व ओम नारखेडे आदी उपस्थितीत होते.

Protected Content