पाळधी शिवारातील विहिरीतून ईलक्ट्रिक मोटारीची चोरी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारातील विहिरीतून २४ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून येण्याचे घटना समोर आले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुरुवार ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुंडलिक दौलत भडांगे (वय-५०) रा. पहूर कसबे ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारात शेत आहे. २ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीतील २४ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. पुंडलिक भडांगे यांनी त्यांचा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध घेऊन काहीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवार ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.

Protected Content