जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आव्हाने बसस्थानकाजवळ तरुणासह वडील व भाऊ यांना काहीही कारण नसताना चौघांकडून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात प्रदीप धनशाम पाटील हा तरुण वास्तव्याला असून त्याचा चहाचा व्यवसाय आहे. गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसताना त्याचा भाऊ सचिन पाटील याला गावातील सोपान सुभाष पाटील, मुरलीधर शांताराम पाटील, कांतीलाल भावलाल पाटील आणि कैलास मंगल पाटील सर्व राहणार आव्हाने तालुका जळगाव या चौघांनी शिवीगाळ केली. तर यातील सोपान पाटील याने लाकडी दांडका तर मुरलीधर पाटील याने लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच कैलास पाटील याने ट्रॅक्टरच्या हायड्रोलीक नळीने प्रदीप पाटील याच्या वडीलांच्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, प्रदीप पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित सोपान सुभाष पाटील, मुरलीधर शांताराम पाटील, कांतीलाल भावलाल पाटील, कैलास मंगल पाटील (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे.