जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा व मोहाडी शिवारात मोबाईल टॉवरवरील फाईव्ह जीचे मॉडेल चोरल्याची घटना घडली. चोरलेले मॉडेल पुणे येथे विक्री केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळ रविंद्र अरविंद पाटील (वय ४५) हे वास्तव्यास असून त्यांचा खासगी नोकरी करतात. १ ऑगस्ट रोजी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील मोबाईल टॉवरुन मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तर २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवर वर लावलेले दोन मॉडेल संशयित परवेज उर्फ बबलू महेमुद पिंजारी (वय २९, रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) व समीर शेख शाकीर शेख (वय २४, रा. आझादनगर, पिंप्राळा हुडको) यांनी चोरुन नेले. ते मॉडेल या चोरट्यांनी पुणे येथील पिसोळी येथील रिजवान निसार अहमद अली (वय ३२) याला विक्री केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.