अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील म्हसले गावात राहणाऱ्या एका तरूणीला जुन्या वादातून दोन जणांनी शिवीगाळ करत घरात घुसून केस ओढून मारहाण करत विनयभंग केला तर तिच्या दोन्ही भावांना देखील मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुपारी अडीच वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील म्हसले गावात १८ वर्षीय तरूणी ही वास्तव्याला आहे. १७ मे रोजी गावातील लग्नाच्या हळद समारंभात झालेल्या किरकोळ कारणावरून गावात राहणारे राहूल अधिकार पाटील आणि पवन अधिकार पाटील या दोघांनी रविवारी १८ मे रोजी दुपारी अडीच वाजता तरूणीला शिवीगाळ केली. तसेच तिच्या घरात घुसून तिचे केस ओढून विनयभंग केला आणि तसेच तरूणीच्या दोन्ही भावांना देखील बेदम मारहाण केली. याप्रकरणी तरूणीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल पाटील आणि पवन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.