जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी १८ मे रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावाा २५ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिच्या गावात राहणारा प्रभाकर खंडू महाले वय ४० हा रविवारी १८ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरात एकटी असतांना तिच्या घरात घूसून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रभाकर महाले याच्या विरोधात सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.