दुचाकी चोरून कमी किंमतीत विक्री करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी करून कमी किंमतीत विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

 

तुषार संतोष सपकाळे वय २२, तेजस विकास सपकाळे वय २० दोघे रा. अंजाळा ता. यावल व राहूल शाम मोरे वय २० रा. हनुमंतखेडा ता.एरंडोल अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार यावल तालुक्यातील अंजाळे येथील दोन तरुण हे दुचाकी चोरी करुन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अंमलदार दिपक पाटील, महेश महाजन, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, अशोक पाटील यांचे पथकाला अंजाळा येथे रवाना केले. अंजाळा येथून संशयित तुषार सपकाळे व तेजस सपकाळे या दोघांना पथकाने अटक केली. त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीची कबूली दिली असून त्यांच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावल येथून दुचाकी चोरीची कबूली दिसून असून ती दुचाकी एरंडोल तालुक्यातील राहूल मोरे यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने राहूल मोरे याला सुध्दा अटक केली. तीनही संशयितांना पुढील तपासासाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content