जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील संस्कार कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरुन १५ लाख रुपये आणावेत अन्यथा तिला नांदवणार अशी धमकी देत तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणाांविरोधात शनिवार, ८ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील वाघनगरातील संस्कार कॉलनीतील माहेर असलेल्या समिक्षा यांचा अमरावती जिल्ह्यातील योगेश लतीश देशुमख यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, यानंतर पतीसह सासरच्यांनी समीक्षा यांच्याकडे तिने माहेरुन १५ लाख रुपये आणावे अशी मागणी केली, पैसे आणले नाही तर नांदवणार नाही, अशी धमकी देत वेळोवेळी शिवीगाळ करत शिवीगाळ तसेच मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून समिक्षा देशमुख ह्या माहेरी निघून आल्या व त्यांनी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक हे करीत आहेत.