प्लॉट घेण्यासाठी पातोंडा येथील विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील पातोंडा येथील विवाहितेला माहेरहून एक लाख रुपये आणावे यासाठी पतीसह सासू आणि दीर यांनी छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ता सुनील कुंभार (वय-२८) रा.गणेशपुर ह.मु. पातोंडा चाळीसगाव जि.जळगाव यांचा विवाह ९ मे दोन २०१७ रोजी सुनील चिंतामण जगदाळे रा. गणेशपुर ता. चाळीसगाव यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर पती सुनील जगदाळे यांनी बांधकाम सेंटिंग व्यवसाय व प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावेत यासाठी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सासू आणि दीर यांनी देखील याला पाठपुरावा आणि प्रोत्साहन दिले. त्यानुसार पती सुनील जगदाळे यांनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन गांजपाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पातोंडा येथे निघून आल्या. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू शकुंतला चिंतामण जगदाळे आणि दीर अनिल चिंतामण जगदाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक प्रविण संगिले करीत आहे.

 

Protected Content