पाच ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक

LCB report

जळगाव प्रतिनिधी । चोपडा शहर आणि तालुक्यासह इतर ठिकाणी घरफोडी करणारे दोन गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखवताच पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. दोघांच्या ताब्यातील लॅपटॉप मोबाईल आणि सोन्याची चैन असा एकुण 1 लाख 73 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल अमरसिंग बारेला (वय-21) रा. गौऱ्यापाडा ता. चोपडा आणि कालुसिंग शिवराम बारेला (वय-19) रा. चहार्डी ता. चोपडा असे दोघा चोरट्यांचे नाव असून दोघांविरोधात गुन्हा दाखल असलेल्या भुसावळ बाजारपेठ, शहादा, जळगाव तालुका, रामानंदनगर व धरणगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून या दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ६ मोबाईल, ४ लॅपटॉप व दीड तोळे वजनाचे दागिने असा जवळपास १ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला आहे.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज पाटील, शरीफ काझी, युनूस शेख, विजय पाटील, विकास वाघ, योगेश वराडे, गफूर तडवी, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, इद्रीस पठाण यांनी तपासचक्रे फिरवून सुनिल बारेला व काळुसिंग बारेला हे दोघे बर्‍हाणपूर -अंकलेश्‍वर रोडवरील सातपुडा हॉटेलजवळ आले असता, दोघांना सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Add Comment

Protected Content