यावल येथे संविधान बचाव समितीतर्फे १७ जानेवारीला ठीय्या आंदोलन

yawal aandolan

यावल, प्रातिनिधी | देशातील केन्द्र शासनाने मंजुर केलेल्या सी.ए.ए. व एन.आर.सी.च्या निषेधार्थ येथील संविधान बचाव समितीच्या वतीने येत्या १७ जानेवारीस ठिय्या आंदोलन करण्यात येणार असुन, या संदर्भातील एक निवेदन शहरातील सविधान बचाव समिती आणि मुस्लीम नागरिकांतर्फे आज (दि.११) पोलीस प्रशासनाकडे परवानगी व बंदोबस्त मिळण्यासाठी देण्यात आले.

 

येथील पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, १७ जानेवारीला शहरातील सविधान बचाव समितीच्या माध्यमातुन यावल तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाने लादलेल्या नागरिकत्व कायद्याच्या निषेर्धात देशाच्या संविधानानुसार समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तो दिवस आठवडे बाजाराचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने परवानगी आणि बंदोबस्त मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

येथील तहसीलदार जितेन्द्र कुवर व पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अनिल निळकंठ जंजाळे, कादीर खान करीम खान, शेख हकीम शेख अलाउद्दीन, नगरसेवक मनोहर बाबुराव सोनवणे, नगरसेवक अस्लम शेख नबी, समिर खान तस्लीम खान, माजी नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, गौतम नथ्थु पारधे, प्रमोद मधुकर पारधे, मुक्तार ईसा पटेल, फिरोजशाह जमीर शाह, ताहेर शेख चांद आदी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content